बेळगाव : कावळेवाडी (बेळगाव) येथील उदयोन्मुख कुस्तीपटू पै.स्वस्तिक मोरे यांने या वर्षात विविध गावांमधील कुस्ती आखाड्यात उल्लेखनीय कामगिरी करून गावचे नाव उज्ज्वल केले आहे.
गेल्या चार महिन्यांत तब्बल अकरा ठिकाणी तो यशस्वी झाला आहे. आनंदवाडी, तुडये, खानापूर,बिजगर्णी, तीर्थकुंडये, सावगाव, कंग्राळी, उचगाव, कणबर्गी, संतीबस्तवाड, यळ्ळूर हे कुस्ती आखाडे गाजवले आहेत. आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवून भविष्यात आपण एक उत्तम पैलवान होऊ हा आशावाद त्याने सिद्ध केला आहे.
सध्या तो भांदुर गल्लीत कुस्तीचा सराव करतो आहे. राष्ट्रीय कुस्ती कोच मारुती घाडी यांचं मार्गदर्शन लाभत आहे.
स्वस्तिकचे आजोबा मोनाप्पा य. मोरे यांची इच्छा आहे की तो नक्कीच गावचे नाव उज्ज्वल करील. या त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta