बेळगाव : हलगा विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. आर. एम. चौगुले यांच्या प्रचारात भव्य अशी मोटरसायकल फेरी काढण्यात आली.
हलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवमुर्तीला समितीचे नेते ऍड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रेरणामध्ये झाल्यानंतर या भव्य मोटरसायकल फेरीला सुरुवात करण्यात आली. प्रथमता हलगा गावातील प्रत्येक गल्लीमध्येही फेरी जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, आर. एम. चौगुलेंचा विजय असो, बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. भगवे ध्वज, भगव्या टोप्या व गळ्यामध्ये भगवे शाल परिधान करून कार्यकर्त्यांनी भाव्य अशी मोटरसायकल फेरी जात होती. हलगा झाल्यानंतर बस्तवाड, कोंडोस्कोप, कोळिकोप, तारीहाळ, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी या गावांमध्ये ही फेरी काढण्यात आली. प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन वातावरण समितीमय केले. शिंदोळी गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या फेरीची सांगता करण्यात आली. या फेरीमध्ये हालगा विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोहर संताजी, सागर बिळगोजी, विठ्ठल पाटील, मारुती बेळगावकर, मल्लाप्पा कालींग, कल्लाप्पा संताजी, प्रसाद धामणेकर, राजू कानोजी, महादेव सामजी, सुधीर खानगावकर, रमेश खाणगांवकर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta