बेळगांव : दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी आज बेळगांव उत्तर मंडळाच्या वतीने महाशक्ति केंद्र नं. 5 कणबर्गी येथे बुथ स्तरावर बैठक झाली.
पक्षाचे विधान वार्ड बुथमधील कार्यकर्त्यांसमवेत आमदार अनिल बेनके यांनी चर्चा करुन शक्तिकेंद्रामध्ये असलेल्या जनतेच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली. जनतेच्या समस्या जाणुन घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या संदर्भात बेळगांव विभागाचे सह संघटन प्रधान कार्यदर्शी श्री. जयप्रकाश जी., उत्तर मंडळ अध्यक्ष श्री. पांडुरंग धामणेकर, महानगर जिल्हा प्रधान कार्यदर्शी श्री. मुरगेंद्रगौडा पाटील, बेळगांव उत्तर मंडळ प्रधान कार्यदर्शी श्री. विजय कोडगनूर, श्री. इरय्या खोत, कार्यदर्शी श्री. विनोद लंगोटी, महानगर सामाजिक जालताण संचालक श्री. केदारनाथ जोरापुर, सह संचालक श्री. मंजुनाथ भजंत्री, महाशक्तिकेंद्र प्रमुख बी. बी. पाटील, बुथ अध्यक्ष, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …