Sunday , July 21 2024
Breaking News

बेळगावसह राज्यभरात एसीबीचे छापे; बेळगावात ३ ठिकाणी धाडी : परदेशी चलन आढळले

Spread the love

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात एसीबीने बुधवारी सकाळी–सकाळीच ३ अधिकाऱ्यांच्या घरांवर धाडी टाकून बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आणली. त्यातही बेळगाव शहरात टाकलेल्या धाडीत विदेशी चलन आढळून आले. या धाडसत्रामुळे सरकारी अधिकाऱ्यांत खळबळ माजली आहे.होय, अँटी करप्शन ब्युरोने आज बेळगावसह राज्यभरात एकाचवेळी धाडी घालून एकच खळबळ उडवून दिली. तब्बल ६० ठिकाणी या धाडी घालण्यात आल्या. बेळगाव जिल्ह्यात ३ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. बेळगाव शहरात हेस्कॉमचे सहायक तांत्रिक अधिकारी नाथाजी पाटील यांच्या वैभवनगरातील घरावर एसीबीने छापा मारला. एसीबीचे पोलीस प्रमुख बी. एस. न्यामगौडा यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने हा छापा टाकला. या छाप्यात नाथाजी पाटील यांच्या घरी डॉलर्सच्या नोटा आढळून आल्या. घरातील कागदपत्रांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मालमत्तांची कागदपत्रे आणि बेहिशोबी रोकड सापडली. छाप्याच्या वेळी नाथाजी पाटील घरीच होते. त्यांच्या घरी सोन्या-चांदीचेच नव्हे तर प्लॅटिनमचे दागिनेही आढळून आले. त्याशिवाय हेस्कॉमशी संबंधित फाईल्स, जमिनीची कागदपत्रेही आढळून आली आहेत. याचप्रमाणे गोकाकमधील परिवहन मंडळाचे अधिकारी सदाशिव मरलिंगनवर यांच्या विवेकानंद नगरातील ७व्या क्रॉसवरील घरावर आणि अन्य ६ ठिकाणीही एसीबीने छापा मारले. एसीबीचे डीवायएसपी करुणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे छापे मारले. त्यांचे उत्पन्न, मालमत्ता आदींच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय बैलहोंगल येथील सहकार खात्याचे विकास अधिकारी ए. के. मास्तीगे यांच्या बैलहोंगल शहरातील घरासह ३ ठिकाणी एसीबीने छापे मारले. याठिकाणीही मालमत्तांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. बेळगाव उत्तर विभागाचे अँटी करप्शन ब्युरोचे एसपी न्यामगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे छापासत्र सुरु आहे. यात ४ डीवायएसपी, १५ पोलीस निरीक्षक आणि ६० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एसीबी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु ठेवली असून काही आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाल्मिकी महामंडळ घोटाळा; सरकार ८५ कोटी रुपये वसूल करणार : सिद्धरामय्या

Spread the love  भाजपच्या भ्रष्टाचारावर टीका बंगळूर : सरकार एसटी विकास महामंडळात लुबाडलेले ८५.२५ कोटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *