अधिकाऱ्यांची कारवाई
कोगनोळी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असलेल्या तपास नाक्यावर खाजगी चार चाकी वाहनाची तपासणी केली. यामध्ये 4 लाख 17 हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले. घटना मंगळवार तारीख 25 रोजी रात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष नवले (राहणार मुंबई) हे आपल्या खाजगी चार चाकी गाडीने मुंबईहून धारवाडकडे जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर आले असता बसची तपासणी केली. यावेळी संतोष नवले यांच्याकडे 4 लाख 17 हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा केला.
निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रमेश पोवार, प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, उपनिरीक्षक रेवांना गुरीकार, शिवप्रसाद कडकन्नावर, राजू गोरखन्नावर, संदीप गाडीवडर, किरण पुजारी, ग्राम विकास अधिकारी लक्ष्मण पारे, कुरलीचे कट्टी आदी कर्मचारी उपस्थित होते.