
बेळगाव : सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार दणक्यात सुरु असून ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज निलजी, मुतगा भागाचा दौरा केला. कार्यकर्त्यांसमवेत निलजी, मुतगा गावात ठिकठिकाणी प्रचारासाठी गेलेले आर. एम. चौगुले यांना संपूर्ण गावात उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी आर. एम. चौगुले यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. समितीच्या, सीमाप्रश्नाच्या आणि आर. एम. चौगुले यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी आर. एम. चौगुले यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. यावेळी म. ए. समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभाग घेत इतरांनाही प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले.
आगामी निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना धूळ चारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला बहुमतांनी विजयी करावे, सीमाभागात पुन्हा एकदा मराठी भाषिकांची सत्ता स्थापन करून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आपला उमेदवार विधानसभेत पाठवावा, असे आवाहन आर. एम. चौगुले यांनी मतदारांना केले.
Belgaum Varta Belgaum Varta