बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या रोड शो व जाहीर सभेचे रविवार दि. 30 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
रमाकांत कोंडुसकर यांच्या पदयात्राना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद व मतदारांचा पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे त्यातच आता महाराष्ट्रातून विविध पक्षांची नेतेमंडळी प्रचारासाठी येणार असल्याने मतदारांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
रविवारी सायंकाळी 6 वा. वडगाव मंगाई मंदिर येथून रोड शो ला प्रारंभ होईल. त्यानंतर पाटील गल्ली येथून कारभार गल्ली पिपळकट्टा ते येथून वडगाव मेन रोड, बॅ. नाथ पै चौक येथून शहापूर खडे बाजार ते छ. शिवाजी महाराज उद्यान जवळील शिवसृष्टी येथे रोडशोची सांगता व जाहीर सभेत रूपांतर होईल यावेळी आ. पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.
रोड शो व जाहीर सभेत पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta