बेळगाव : हलगा येथील मरगाई देवीला चांदीचा मुखवटा व चांदीची चवार कलमेश्वर, हनुमान, भावकेश्वरी, मंदिर निर्माण कमिटीचे अध्यक्ष चारूकिर्ती सैबन्नावर व जयश्री सैब्बन्नावर यांचे चिरंजीव सुहास सैब्बन्नावर व गीता सैब्बन्नावर यांनी भेट दिली. शुक्रवार दिनांक 28 रोजी सकाळी मरगाई मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमानिमित्त मरगाई मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने सुहास सैब्बन्नावर कुटुंबियांचे त्यांच्या घरापासून वाजत गाजत मरगाई मंदिर पर्यंत मिरवणुकीने आणण्यात आले. मरगाई मंदिर परिसरात आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. मरगाई देवीला विधिवत अभिषेक पूजन व आरती सुहास सैब्बन्नावर यांच्या हस्ते करण्यात आली. आरती झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष धाकलू बिळगोजी यांच्या हस्ते सुहास सैब्बन्नावर व गीता सैब्बन्नावर यांचा शाल, श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी मरगाई मंदिर जिर्णोध्दार कमिटीचे अध्यक्ष धाकलू बिळगोजी, उपाध्यक्ष बाबू देसाई, सदस्य शिवाजी संताजी, पिराजी मोरे, चारुकीर्ती सैब्बन्नावर, कृष्णा संताजी, मोनाप्पा बिळगोजी, बाबू शिंदे, अशोक पायक्का, फकीरा संताजी, अनिल शिंदे, मल्लाप्पा कालींग, अर्जुन कानोजी, सोमन्ना परीट आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta