बेळगाव : श्री आदी शंकराचार्य जयंती भक्तिभावाने चिदंबर नगर येथील श्री चिदंबर मंदिरात साजरी करण्यात आली. श्री आदी शंकराचार्य जयंती निमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वेदमूर्ती डॉ.चंद्रशेखर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले. लघु रुद्राभिषेक, भजन, प्रवचन आणि महाप्रसाद कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांच्या साठी स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्तोत्र पठण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोपाळराव कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आदी शंकर भगवपदरू या कन्नड पुस्तकाचे प्रकाशन वेदमूर्ती डॉ.चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ एस. एम. कुलकर्णी, प्रा.संजीव कुलकर्णी आणि लेखक गोपाळराव कुलकर्णी उपस्थित होते. स्तोत्र पठण स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta