Wednesday , December 10 2025
Breaking News

दक्षिणेत घुमला रमाकांत कोंडुसकर यांचा आवाज!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांची प्रचार फेरी शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी सात वाजता सुरूवात झाली.

पदयात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन करून पदयात्रेला जुने बेळगाव व खासबाग नाका येथून संपूर्ण जुने बेळगाव आणि वडगाव विभागीय पहिल्या सत्रात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर पदयात्रेला सुरूवात झाली. स्वागत माजी नगरसेवक अनिल पाटील यांनी केले. प्रारंभी उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक राजू बिरजे, मनोहर होसुरकर, नितीन खन्नूकर, अनिल अमरोळे, उमेश पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, श्रीधर पाटील, माजी नगरसेवक विजय भोसले, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, माजी उपमहापौर रेणू मुतगेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, शिवानी पाटील, भाग्यश्री पाटील, श्रेया पाटील, बंडू केरवाडकर, महेश जवेकर, दत्ता उघाडे, ज्ञानेश्वर मन्नूरकर, बाबू नावगेकर, संतोष शिवनगेकर, पुंडलिक चव्हाण शंकर चौगुले, सुभाष आपटेकर, महेश काकतकर, अमोल देसाई उमेश पवार, दिलीप नाईक, मंगेश धामणकर, नारायण दिवेकर, यल्लाप्पा कनवरकर, सुरेश रेडेकर, मोहन शिवनगेकर, सागर पाटील यांच्या हस्ते विविध ठिकठिकाणी पाठिंबा दर्शवून उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचे जल्लोषी स्वागत करून यावरील मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला. यानंतर वडगाव येथील विष्णू गल्लीत प्रवेश करत तेथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संपूर्ण जुने बेळगावसह खासबाग येथील घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. येथील परिसर पिंजून काढला. यानंतर कुलकर्णी गल्ली, गणेश पेठ, हरिजन वाडा, लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नूकर गल्ली, कलमेश्वर मंदिर रोड, कलमेश्वर मंदिर परिसर, धामणे रोड, मंगाई नगर, विष्णू गल्ली, वझे गल्ली, जुना राजवाडा कंपाउंड, कारभार गल्ली, सोनार गल्ली, पिंपळकट्टा येथे पदयात्रीचे सांगता करण्यात आली.

शिवजयंती उत्सव मंडळ व पंचमंडळ विष्णू गल्ली, नरवीर युवक मंडळ आणि पंचमंडळ कारवार गल्ली, शिवजयंती उत्सव मंडळ पंचमंडळ कारवार गल्ली, गणेश उत्सव मंडळ कारभार गल्ली सार्वजनिक साप्ताहिक फंड यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. अमित हणमंत कंग्राळकर, महेश पाटील, शशिकांत चव्हाण, रमेश पाटील, श्रीकांत पाटील, रमाकांत बाळेकुंद्री, भैरू कंग्राळकर रणजीत पाटील, लव पाटील, सुभाष पाटील, अमर पाटील, उदय पाटील, महादेव पाटील यासह वडगाव परिसरामध्ये विशेष फलकांच्या वरती लिहून मराठी माणसांच्या एकजुटीसाठी एकत्र येवून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले जातील असा जाहीर पाठिंबा देण्यात आला. मराठी भाषेच्या आमदाराला निवडून आणण्यासाठी अविरत कार्य केले जाईल असे आश्वासन दिले.

वझे गल्लीतून राजवाडा कंपाउंड भागातील मतदारांना भेटून मंगाई नगर, कारभार गल्ली, पाटील गल्लीतून यरमाळ रोड येथे सांगता. पदयात्रेत या भागातील आजी माजी नगरसेवक, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *