बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत योग्य ती नुकसान भरपाई द्यावी याकरिता तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उद्या म्हणजे शुक्रवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी निवेदन देण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आहे.
युवा समितीच्यावतीने उद्या जिल्हाधिकार्यांना निवेदन
ओला दुष्काळ जाहीर करत शेतकर्यांना भरीव नुकसानभरपाई देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता निवेदन देण्यात येणार आहे तरी सर्वानी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित रहावे.
