बेळगाव : डिप्लोमा आर्किटेक्चरच्या एका गरीब विद्यार्थिनीला बेळगावातील नियती फौंडेशनच्या वतीने अभ्यासासाठी लॅपटॉप भेट देण्यात आला. नियती फौंडेशनचे डॉ. समीर सरनोबत आणि डॉ. सोनाली सरनोबत यांच्या पुढाकारातून एका गरीब विद्यार्थिनीला अभ्यासासाठी लॅपटॉप भेट देऊन मदतीचा हात देण्यात आला. बेळगावातील वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा आर्किटेक्चर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत असणारी वैष्णवी बसुर्तेकर या विद्यार्थिनीला फौंडेशनतर्फे लॅपटॉप भेट देण्यात आला. वैष्णवी हिच्या घरची परिस्थिती नाजूक आहे. ती अभ्यासातही हुशार आहे. तिला अभ्यासात मदत व्हावी या उद्देशाने ही मदत देण्यात आली. याबाबत नियती फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, वैष्णवी हिची गरीब परिस्थिती ओळखून तिला तिला अभ्यासात मदत व्हावी या उद्देशाने फौंडेशनतर्फे ही मदत देण्यात आली आहे. त्यामुळे या गरीब पण प्रतिभावंत विद्यार्थिनीला मदत होईल. नियती फौंडेशनतर्फे समाजातील गरीब प्रतिभावंत विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करण्यात येते असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी नियती फौंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली. याप्रसंगी प्रसिद्ध कर सल्लागार सुरेश खन्नूकर, वेदांत सोसायटीचे अध्यक्ष व प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू सुनील आपटेकर आणि दानशूर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta