बेळगाव : एसकेई सोसायटीचे राणी पार्वती देवी महाविद्यालय हे बेळगावातील प्रसिद्ध आणि नामवंत महाविद्यालय. उत्तम शैक्षणिक दर्जा, कुशल आणि दर्जेदार प्राध्यापक वृंद, भव्य आणि निसर्गरम्य व नॅककडून ‘अ’ – श्रेणी प्राप्त महाविद्यालय, उत्तम शिक्षण, सुंदर परिसर, भव्य क्रीडांगण, अद्ययावत आणि भव्य ग्रंथालय अशा सर्व सोयीनी युक्त असे महाविद्यालय अशा अनेक गोष्टींसाठी दक्षिण भारतातील प्रसिद्ध असे महाविद्यालय या सर्व घटकांची नोंद घेऊन यावर्षी महाविद्यालयाच्या स्वायत्त दर्जासाठी दि. 22 व 23 नोव्हेंबर रोजी यूजीसी समितीने महाविद्यालयाला भेट दिली. सर्व घटकांचे निरीक्षण केले.
महाविद्यालयाच्या आतापर्यंतच्या विकासाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. यूजीसी स्वायत्त समितीचे अध्यक्ष श्री श्री विद्यापीठ, कटक कुलगुरु प्रा. अजय कुमार सिंग, सदस्य -भारतीय विद्या भवनचे विवेकानंद कॉलेज ऑफ सायन्स, ह्युमॅनिटीज अँड कॉमर्स (स्वायत्त) सिकंदराबाद, तेलंगणा प्राचार्य डॉ. वाय. अशोक, राज्यशास्त्र विभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली प्रा. सतीश कुमार विद्यापीठाचे प्रतिनिधी – प्रा. विजय एफ. नागन्नावर (इंग्रजी विभाग, आरसीयू, बेळगावी) डॉ. लता के. सी. (शिक्षण अधिकारी युजीसी-एसडब्लूआरओ बेंगलोर) यांचा समावेश होता.
सर्व प्रथम समितीशी प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी महाविद्यालयाच्या कार्याबद्दल सविस्तर संवाद साधला. त्यानंतर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकूर व सहकारी यांच्या बरोबर संवाद झाला. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागाने आपल्या विभागाची माहिती सादर केली. आजी- माजी विद्यार्थी, प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्याशी चर्चा संपन्न झाल्या. संध्याकाळी ‘देश एक रंग अनेक’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. त्या दरम्यान एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर यांनी स्वायत्त समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार केला. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सर्व व्यवस्थापन मंडळ सदस्य, संस्थेचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, आजी- माजी विद्यार्थी, हितचिंतक उपस्थित होते. दुसर्या दिवशी आय.क्यू.एसी, वित्त, परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया विभाग इत्यादी विभागांची पाहणी झाली. या बौद्धिक संमेलनाची समाप्ती समारोप सभेने झाली. कुलगुरु प्रा. अजयकुमार सिंग यांनी यावेळी बोलताना महाविद्यालयाचा परिसर, ग्रंथालय, उपलब्ध सोयीसुविधा व तज्ञ प्राध्यापक वर्ग याबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेचा संचालक वर्ग तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या यांच्या मार्गदर्शनाखाली स्वायत्त समितीची दोन दिवसीय भेट यशस्वीरित्या संपन्न झाली.
Check Also
विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या 55 व्या वर्षपूर्ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन; प्रसिद्ध गायिका बेला शेंडे प्रमुख आकर्षण
Spread the love बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम …