बेळगाव : वडगावमधील 110 केव्ही उपकेंद्रात वीजवाहिन्या तपासणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने काही उपनगरांचा वीजपुरवठा उद्या रविवारी दि. 28 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खंडित करण्यात येणार आहे. त्यानुसार नाथ पै. सर्कल, विद्यानगर परिसर अनगोळ, विद्यानगर , आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीरनगर, भांदूर गल्ली, संत मीरा स्कूल रोड, अनगोळ- वडगाव रोड, गुलमोहोर कॉलनी, समृध्दी कॉलनी, पारिजात कॉलनी, ओंकारनगर.
भाग्यनगर परिसर – भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस.
येळ्ळूर रोड परिसर – आनंदनगर, संभाजीनगर, केएलई हॉस्पीटल परिसर, आदर्शनगर, हिंदवाडी, जेल शाळा, फुले गल्ली, अन्नपूर्णेश्वरीनगर, गणेशनगर.
वडगाव परिसर- नेकार कॉलनी, निजामियानगर, रयत गल्ली, विष्णु गल्ली.
सुभाष मार्केट परिसर- हिंदवाडी, रानडे कॉलनी व गोवावेस.
बाजार गल्ली परिसर- भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाउंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, मेघदूत सोसायटी यासह परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असे हेस्कॉमतर्फे कळविण्यात आले आहे.
