Thursday , April 23 2026
Breaking News

ऍड. सुधीर चव्हाण यांचा शिवसेनेच्यावतीने सन्मान

Spread the love

बेळगाव शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कायदे सल्लागार ऍड. सुधीर चव्हाण यांची बेळगाव जिल्हा बार असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ऍड. सुधीर चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. सुधीर चव्हाण एक क्रियाशील कार्यकर्ते तर आहेतच शिवाय शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कायदे सल्लागार म्हणून ते मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या प्रामाणिक कार्याची पोचपावती म्हणून त्यांची बेळगाव जिल्हा बार असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे प्रकाश शिरोळकर यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी ऍड. सुधीर चव्हाण यांच्या निवडीबद्दल कौतुक केले.
प्रारंभी शिवसेना जिल्हा संघटक रवींद्र जाधव यांनी श्री गणेश प्रतिमेचे पूजन केले. माजी उपजिल्हा प्रमुख महेश टंकसाळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. यानंतर एडवोकेट सुधीर चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
शिवाजी सुंठकर यांनीही, शाल आणि पुष्पहार घालून सुधीर चव्हाण यांचा सत्कार केला. याप्रसंगी पुंडलिक पावशे, एपीएमसीचे माजी अध्यक्ष आप्पा जाधव, बेळगुंदी कृषी पत्तीनं संघाचे चेअरमन देवाप्पा शिंदे, शिवसेना जिल्हा संघटक रवींद्र जाधव, महेश टंकसाळी, बाळासाहेब डंगरले, राजेश कदम, विजय सावंत, रमेश माळवी, प्रथमेश शिरोळकर, युवा सेनेचे महेश जुवेकर, अद्वैत चव्हाण- पाटील, प्रणव बेळगावकर, प्रणव हुलजी, विनायक हुलजी यासह अन्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Spread the love  बेळगाव : बेळगाव न्यायालय परिसरात स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *