बेळगाव : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा डोंगरावर वेगवेगळ्या कामात गुंतलेल्या सुमारे ५० मुलांची मुक्तता करण्यात आली. भिक्षाटनाबरोबरच पूजेच्या साहित्याची विक्री करण्यातही ही मुले कार्यरत होती.
जिल्हा बालसंरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बाल कल्याण खाते, पोलीस, तहसीलदार, समाज कल्याण खाते, कामगार खाते, सार्वजनिक शिक्षण खाते, बाल कल्याण समिती, मुलांची साहाय्यवाणी, आरोग्य व कुटुंब कल्याण खाते आदींच्या पुढाकारातून दोन दिवसांपूर्वी यल्लम्मा डोंगरावर मोहीम राबविण्यात आली.
डोंगरावरील दुकानांत तपासणी
१३ ते १८ वयोगटातील सुमारे मुले डोंगरावर भिक्षा परिसरातील ५० मागण्याबरोबरच हॉटेलात काम करत होती. पुजेच्या साहित्याचीही विक्री करीत होती. दुकानावर छापे टाकून नारळ, केळी, कापूर विक्रीसाठी लहान मुलांना जुंपणाऱ्या दुकानांतही तपासणी करण्यात आली. डोंगरावर सुमारे ५० मुले आढळून आली.
या मुलांना ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. सौंदत्ती येथील मुलींच्या बाल मंदिरामध्ये जिल्हा बाल कल्याण समितीची विशेष बैठकही भरविण्यात आली. भिक्षाटन निर्मूलन व बाल न्याय कायद्याविषयी माहिती देऊन
यापुढे लहान मुलांना कामासाठी जुंपू नये, भिक्षा मागण्यासाठी त्यांचा वापर करू नये, अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महांतेश बजंत्री, बाल कल्याण समितीचे सदस्य मौलासाब मदनसी, श्री यल्लम्मा देवीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश, अरविंद माळगी, सौंदत्तीचे पोलीस मंडळ निरीक्षक करुनेश गौडा, जिल्हा बाल संरक्षण विभागाचे राजू मादर, फक्रुद्दीन तहसीलदार, महेश संग्यानट्टी, जे. टी. लोकेश्वरप्पा, सचिन हिरेमठ, श्रीदेवी गुळ्ळ, बाल साहाय्यवाणीचे एम. के. कुंदरगी, शिवलिला हिरेमठ, निंगाप्पा आदींसह वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला होता.
Belgaum Varta Belgaum Varta