Share
बेळगाव : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवीच्या गाऱ्हाणे कार्यक्रम शुक्रवार दि. 9 जूनला घातले जाणार आहे. रात्री 8 वा. हा कार्यक्रम होणार असून यावेळी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील परिवारातर्फे करण्यात आले आहे. यावर्षी 11 जुलै रोजी मंगाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
बेळगाव शहरातील प्रमुख यात्रा म्हणून श्री मंगाई देवीची यात्रा ओळखली जाते. मंगाई देवीचे लाखो भक्त आहेत. यात्रेनिमित्त हे भक्त देवीच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. यात्रेला अजून महिनाभराचा कालावधी असला तरी आतापासून यात्रेचे नियोजन केले जात आहे. शेतकऱ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
Post Views:
604
Belgaum Varta Belgaum Varta