Saturday , March 7 2026
Breaking News

काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या गाडीला काकतीजवळ अपघात; दोघांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या विरोधात बेळगावात विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावात येणाऱ्या बेळगाव तालुक्यातील शिवापूर गावातील मुप्पिन काडसिद्धेश्वर मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या गाडीला काकतीजवळ अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला, तर स्वामीजी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या विरोधात बेळगावात विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवापूर काडसिद्धेश्वर मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावला येत होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव तालुक्यातील काकती गावाजवळ कंटेनरने स्वामीजींच्या गाडीला धडक दिली. या धडकेत स्वामीजींच्या दोन सेवकांचा मृत्यू झाला. दोन्ही सेवकांचे मृतदेह बीम्स शवागारात ठेवण्यात आले आहेत त्यांची नाव अद्याप समजलेली नाहीत.

काकती पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे युवकाचे डोळे निकामी; मदतीचे आवाहन

Spread the love  बेळगाव : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना एका युवकाचा डोळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *