Saturday , May 25 2024
Breaking News

गरीब विद्यार्थ्यांचे 19.75 लाख रुपये शैक्षणिक शुल्क सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने भरले!

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या एज्युकेशन फॉर नीडी या सेवाभावी शाखेच्या माध्यमातून शहरातील 166 गरीब गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींचे एकूण 19 लाख 75 हजार रुपये इतके शैक्षणिक शुल्क भरण्यात येणार असून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. आदित्य मिल्क आणि आदित्य आईस्क्रीम कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे सर्वांनाच आर्थिक संकटाची झळ बसली. यातच यंदापासून खंडित झालेल्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरिब पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता लागून राहिली होती.
याची गांभीर्याने दखल घेऊन सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे करताना आपल्या एज्युकेशन फॉर नीडी या शाखेच्या माध्यमातून शहरातील गरीब गरजू मुला -मुलींचे यंदाचे शैक्षणिक शुल्क भरण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यासंदर्भात अर्ज करण्याचे आवाहनही केले.
या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि एकूण 350 अर्ज अनगोळकर फाऊंडेशनकडे आले. या सर्व अर्जांची छाननी आणि शहानिशा करून 166 मुला-मुलींची शैक्षणिक शुल्काच्या मदतीसाठी निवड करण्यात आली. या सर्व मुला-मुलींचे अर्थात विद्यार्थी विद्यार्थिनींचे एकूण शैक्षणिक शुल्क 19 लाख 75 हजार रुपये इतके झाले आहे.
आदित्य मिल्क आणि आदित्य आईस्क्रीम कंपनीच्या सहकार्याने संकलित करण्यात आलेले हे शुल्क संबंधित शाळा -महाविद्यालयांमध्ये आजपासून भरण्यास सुरुवात करण्यात आली.
आज शहरातील भरतेश शैक्षणिक संस्थेच्या ठिकाणी शुल्क भरते वेळी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर, विजयकांत डेअरी अँड फूड प्रोडक्ट्सचे संचालक राजन सोनी, कंपनी सेक्रेटरी रवी हेगडे, समन्वयक नितीन राजगोळकर, भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे व्हाईस चेअरमन राजीव दोड्डणावर, एसपीएच भरतेश कन्नड माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मिरजकर, ए. ए. सनदी, भरतेश इंग्रजी माध्यम शाळेच्या योगिता पाटील आदींसह एज्युकेशन फॉर नीडी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठा सेवा संघातर्फे बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग

Spread the love  बेळगाव : मराठा सेवा संघ, बेळगाव यांच्यावतीने दररविवारी सकाळी १०.०० ते १२.०० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *