Monday , December 4 2023

जळालेल्या ऊसाला भरपाई न दिल्यास आंदोलन

Spread the love

राजू पोवार : बेनाडीतील ऊस जळीत क्षेत्राला भेट
निपाणी : हेस्कॉमतर्फे निपाणी ग्रामीण भागातील शेतीवाडीमध्ये विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्या बसविण्यात आले आहेत. पण अनेक गावांमध्ये विद्युत वाहिन्या लोंबकळत असल्याने त्याचा धोका ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होत आहेत. आतापर्यंत अनेक शेतकर्‍यांच्या ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. पण त्याची जबाबदारी न घेता विज बिल न भरल्यामुळे अनेकांचे विद्युत कनेक्शन कट केले जात आहे. लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याची मागणी संघटनेने केली आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. मात्र शेतातून गेलेल्या वाहनामुळे सर्किट होऊन शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन भरपाई देण्यास मात्र संबंधित खाते तयार नाही. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई न दिल्यास रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. बेनाडी येथे रविवारी (ता.28) शॉर्टसर्किटने 5 एकर ऊसाला लागलेल्या शेतीची पाहणी करून ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, ग्रामीण भागातील अनेक विद्युत वाहिन्या शेतीवाडीमध्ये लोंबकळत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी रात्री-अपरात्री ऊसाला पाणी पाजण्यासाठी शेतीवाडी जात असताना त्यांना धोका होण्याची शक्यता आहे. सध्या बेनाडी, जैनवाडी परिसरात शॉर्टसर्किटमुळे शेतकर्‍यांच्या उसाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पण आजतागायत कोणत्याही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. या उलट सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचे कारस्थान संबंधित खात्यातर्फे सुरू आहे. या संदर्भात योग्य ती पावले न उचलल्यास शेतकरी संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. हेस्कॉमच्या विद्युत खांबाचे काम सुरू असताना वेल्डींगमधून ठिणगी पडून मोठे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये श्रीनिवास जनवाडे, सुरज पाटील, शिवाजी बेरड, तात्यासाहेब पाटील, उदय बेरड, आदेश बेरड, रुक्मिणी बेरड, राजू बेरड, प्रकाश बेरड, संजय बेरड यांचा ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चूक नसताना नुकसान का सोसावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत लवकरच हेस्कॉम आणि तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून शेतकर्‍यांच्या नुकसानीचा जाब विचारला जाणार आहे.
यावेळी सुरज पाटील, कलगोंडा कोटगे, विवेक जनवाडे, श्रीनिवास जनवाडे, सुभाष देवर्षी, भीमा मलाबादे, तानाजी कुंभार, अण्णासाहेब वराळे, संदीप देसाई यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

एस. बी. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील येथील मोहनलाल दोशी विद्यालयात ३१ वर्षे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *