बेळगाव : राज्य शासनाच्या गृहज्योति योजनेतून 200 युनिट पर्यंत वीज मोफत दिले जाणार असली तरी प्रत्येक कुटुंबाची गेल्या वर्षभरातील वीज वापराची सरासरी काढली जाणार आहे. त्या सरासरीपेक्षा दहा टक्के अतिरिक्त युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वच कुटुंबं सरसकट 200 युनिट वीज मोफत मिळणार नसल्याचे नक्की झाले आहे. मोफत विज मिळणार हे गृहीत धरून विजेचा वापर वाढविला जाण्याची शक्यता आहे. तो प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.हेस्कॉम चे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद रोशन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्याचबरोबर घराच्या मूळ मालकाला एका जोडणीवरही सवलत मिळणार आहे. घरमालकाने आपल्या मिळकती भाडे कराराने दिल्या असतील तर तेथील भाडेकरांनाही ते वीज मोफत दिली जाणार आहे. नवीन जोडणी घेतलेल्यांना यंदा 53 मिनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे. एक वर्षानंतर त्यांना 200 पर्यंत मोफत वीज मिळू शकते असेही रोशन यांनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta