बेळगाव : राज्य सरकारने महिलांसाठी शक्ती योजनेअंतर्गत मोफत बस प्रवास सुरू केला आहे. सर्वच बसमध्ये महिलांची झुंबड उडत आहे.गर्दीचा फायदा घेत महिलांच्या सोन्या चांदीचे दागिने, पैसे पळवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बेळगाव शहर पोलिसांनी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना चोरांपासून सावधानता बाळगावी असे आवाहन प्रत्येक बस मध्ये जाऊन करत आहेत.
महिलांसाठी मोफत बस प्रवास सुरू केल्याने बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या प्रचंड वाढली आहे. नातेवाईकांच्या गावांना जाण्यासाठी, देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. वाढलेल्या गर्दीत वादावादीचे प्रसंग घडत आहेत. या गर्दीचा फायदा भामट्या महिलांनी उठवण्यास सुरुवात केली आहे. महिलांच्या बेगा, सोन्या-चांदीचे दागिने, पैसे पळवण्याचे प्रकार वाढले आहेत.त्यामुळे बसमधून प्रवास करणे धोकादायक ठरले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेत, बेळगाव पोलीस आयुक्तालय तर्फे महिला पोलिसांकडून बसमध्ये महिला वर्गात चोरट्यांपासून सावध राहावे असे आवाहन केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta