बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध विनोदी कथा लेखक, रसायन शास्त्राचे प्राध्यापक, मंडळाचे ज्येष्ठ माजी कार्यकारिणी सदस्य प्रा. सुभाष सुंठणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवार दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी मंडळाच्या सभागृहात मंडळाचे ज्येष्ठ शाखा चिटणीस आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, फळकरंडी, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर यांनी केले. आभार मंडळाचे नाट्य शाखा चिटणीस नीता कुलकर्णी यांनी केले. यावेळेस मंडळाचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
