बेळगाव : भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने येत्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली पूर्वतयारीची बैठक आज सकाळी पार पडली.
सदाशिवनगर येथील बौद्ध विहारमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये सालाबादप्रमाणे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून सामाजिक एकता प्रकाश फेरीचे (कॅन्डल मार्च) आयोजन करणे.
याचप्रमाणे येत्या 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्याबरोबरच प्रा. के. डी. मंत्रेशी यांचे व्याख्यान आयोजित करण्याचे ठरले. बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यशवंत सम्राट, सेक्रेटरी शेखर शिंगे, खजिनदार वाय. पी. गडीनायक, समता सैनिक दलाचे दीपक मैत्री, दलीत नेते मल्लेश चौगुले, प्रा. के. डी. मंत्रेशी, एम. आर. कल्पत्री, मल्लेश कुरंगी, अर्जुन देम्मट्टी, महेश कोलकार, सुनील बस्तावडकर, आकाश हालगेकर आदी उपस्थित होते. उपरोक्त कार्यक्रमांना भारतीय बौद्ध महासभा विविध दलित संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी, उपासक -उपासिका व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बाबासाहेब महामंडळच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta