बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेच्यावतीने बेळगाव शहर पोलिसांसाठी एक विशेष कार्यशाळा घेण्यात आली. स्वत:चा जीव संपवून घेणे, भाजून घेणे किंवा विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारात नागरिकांना हाताळण्याचे प्रशिक्षण यावेळी पोलिसांना देण्यात आले. 60 हून अधिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी या पायाभूत कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.
त्यावेळी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जीवनावश्यक मदत कशी पुरवावी याची माहिती देण्यात आली. डॉ. सुनिता रतनजी, डॉक्टर दर्शन राजपूत आणि डॉ. सौम्या वेर्णेकर आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. केएलई शतक महोत्सवी हॉस्पिटलच्या वतीने ही मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली. पोलीस दलाने या प्रशिक्षणाबद्दल विशेष आभार मानले असून अध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ व सेक्रेटरी डॉ. संतोष यांनी हे प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
