कोगनोळी : कुर्ली ता. निपाणी येथील शिंदे गल्लीत राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवार तारीख 30 रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुर्ली तालुका निपाणी येथील शिंदे गल्लीत आप्पासाहेब शामराव पाटील, लक्ष्मीबाई संभाजी पाटील यांचे राहते घर आहे. मंगळवार तारीख 30 रोजी रात्री आठच्या सुमारास घरात विद्युत पुरवठा करणार्या विद्युत वाहिनी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. बघता बघता घरातील प्रापंचिक साहित्य, फर्निचर, यासह रोख रक्कम या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. निपाणी येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. गावातील युवक व अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नाने आग विझविण्यात यश आले. यामुळे पुढील अनर्थ टळला.
