Saturday , July 27 2024
Breaking News

37 व्या स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या स्केटिंगपटुंचे स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love

बेळगाव : कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 37 व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप-2021 स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी चमकदार कामगिरी केली. बेंगळूर येथील सिटी स्केटर्स ट्रॅक आणि कस्तुरी नगर ट्रॅकवर दिनांक 25 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान झालेल्या या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील स्केटिंगपटूंनी 17 सुवर्ण, 3 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह एकंदर 33 पदके पटकाविली.
स्पीड स्केटिंग प्रकारात अवनीश कामनवर यांने तीन सुवर्ण, आराध्या पी हिने दोन सुवर्ण व एक कांस्य, अनुष्का शंकर हिने एक रौप्य, एक कास्य, साईश वडेर ह्याने एक रौप्य एक कांस्य, समीध कनगली याने एक रौप्य, ध्रुव पाटील याने एक कांस्य, मोनिषा टी हिने एक कांस्य, सौम्या कामते हिने तीन कांस्य, सत्यम पाटीलने एक कांस्य, भव्या पाटील हिने एक कांस्य तर वेदिका घडशी हिने एक कांस्यपदक पटकाविले.
फ्री स्टाईल स्केटिंग प्रकारात अवनीश कोरीशेट्टी याने एक सुवर्ण, देवन बामणे याने एक सुवर्ण, अभिषेक नवले याने एक सुवर्ण, प्रीती नवले हिने एक सुवर्ण तर जनधन राज याने एक कास्यपदक मिळविले.
अल्पाइन स्केटिंग प्रकारात अमेय याळगी यांने एक सुवर्ण पदक मिळविले. इनलाइन हॉकीमध्ये साईराज मेंडके यांने एक सुवर्ण, यशवर्धन परदेशी याने एक सुवर्ण, यशपाल पुरोहित याने एक सुवर्ण, मंजुनाथ मंडोळकर याने एक सुवर्ण, भक्ती हिंडलगेकर एक सुवर्ण तसेच अक्षता सावंत हिने एक सुवर्णपदक पटकाविले.
रोलर हॉकीमध्ये शर्वरी साळुंखे हिने एक सुवर्ण पदक मिळविले. घवघवीत यश मिळवलेले बेळगावचे हे स्केटिंगपटूं मागील 12 वर्षांपासून केएलई सोसायटी संचलित लिंगराज कॉलेज आवारातील स्केटिंग रिंक, गोवावेस येथील रोटरी-मनपा स्पोर्ट्स अकॅडमीचे स्केटिंग रिंक तसेच गुड शेफर्ड स्कूलच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचा सराव करतात. या स्केटिंगपटूंना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, राज घाटगे, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि स्केटिंग प्रशिक्षक सुरेश हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, भरत पाटील, विशाल वेसने, विनायक काटकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *