Friday , September 20 2024
Breaking News

आश्वासनानंतर शेतकर्‍यांचे आमरण उपोषण मागे

Spread the love

बेळगाव : सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधकांसह बँकेच्या अधिकार्‍यांनी कृषी कर्जाबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाच्या विरोधात छेडलेले आमरण उपोषण शेतकर्‍यांनी आज मागे घेतले.
मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाने कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ चालविल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी काल मंगळवारी संघाच्या कार्यालयात टाळे ठोकून आमरण उपोषण सुरू केले होते. याबाबतची माहिती मिळताच बेळगाव सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक रवींद्र पाटील, डीसीसी बँकेचे तालुका नियंत्रण अधिकारी (टीसीओ), बँक निरीक्षक अरुण पाटील व रवींद्र पाच्छापुर यांनी आज आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची समस्या जाणून घेण्याबरोबरच त्यांच्या तक्रारी व शंकांचे निरसन केले. तसेच कृषी कर्जासंदर्भातील प्रस्ताव मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाने डीसीसी बँकेकडे पाठविला आहे.
तथापि आचारसंहिता लागू असल्यामुळे येत्या 16 डिसेंबरपर्यंत कांही करता येणार नाही. मात्र त्यानंतर तात्काळ आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी उपोषण करणार्‍या शेतकर्‍यांना दिले. त्याचप्रमाणे 16 डिसेंबर पर्यंतच्या कालावधीत संघाचे सेक्रेटरी अथवा जाणकारांच्या मदतीने शेतकर्‍यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, अशी सूचनाही सहाय्यक निबंधक व बँक अधिकार्‍यांनी केली. कृषी कर्जाबाबतच्या ठोस आश्वासनानंतर शेतकर्‍यांनी आपले उपोषण मागे घेतले.
याप्रसंगी मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन व ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, सेक्रेटरी अमोल पाटील यांच्यासह संघाचे सर्व संचालक आणि गावातील शेतकरी उपस्थित होते. शेतकर्‍यांनी छेडलेले आमरण उपोषण आणि कृषी कर्ज वितरण संदर्भात बेळगाव लाइव्हशी बोलताना चेअरमन सुनील अष्टेकर यांनी आपल्या संघाचे सर्व कामकाज कायद्याच्या चौकटीत व्यवस्थित सुरू असल्याचे स्पष्ट केले. शेतकर्‍यांच्या कृषी कर्जासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जावा यासाठी यापूर्वीच बेळगाव डीसीसी बँकेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
याखेरीज संघाने आपल्या स्वतःच्या निधीतून शेतकर्‍यांना कृषी कर्जाचे वितरण करण्याची तयारी दर्शविली आहे. तथापि कांही विघ्नसंतोषी मंडळींकडून बिनबुडाचे आरोप करून संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी कृषी कर्जासंदर्भात शेतकर्‍यांना कृषी पत्तीन सहकारी संघाच्या विरोधात भडकविण्याचा प्रकार सुरू आहे. तथापि आता खुद्द सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधक आणि बँक अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांसमोर सर्व तो खुलासा करून कर्जाबाबत आश्वासन दिल्यामुळे आमची खरी बाजू स्पष्ट झाली आहे, असे सुनील अष्टेकर यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार

Spread the love  बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *