Friday , April 25 2025
Breaking News

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

Spread the love

कोल्हापूर : कोल्हापूरमधील काँग्रेस आमदाराचं निधन झाल्याची दुःखद बातमी आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळांशी फुटबॉलच्या माध्यमातून त्यांचा थेट संपर्क होता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव कामान त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला होता.

गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये चंद्रकांत जाधव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हार्ट अटॅकमुळे त्यांचे निधन झाले. दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणले जाणार असल्याची माहिती जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिली. चंद्रकांत जाधव यांच्या अचानक एक्झिटने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

चांगभलंच्या गजरात रंगला जोतिबा यात्रेचा गुलाल; लाखो भाविकांची मांदियाळी

Spread the love    कोल्हापूर : गुलाल खोबऱ्याची उधळण. जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर, गगनचुंबी सासनकाठ्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *