Wednesday , March 4 2026
Breaking News

विकास कुमार बेळगाव उत्तर विभागाचे नवे पोलीस महासंचालक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव उत्तर विभाग पोलीस महासंचालक पदी विकास कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे.

बेळगाव उत्तर विभागामध्ये बेळगावसह विजयपुर, धारवाड, बागलकोट आणि गदग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या अगोदर रमण गुप्ता यांची बेळगाव रेंज आय जी पी पदी नियुक्ती झाली होती त्यानंतर लागलीच गुप्ता यांच्या ठिकाणी लोकेश कुमार यांच्या नावाचा देखील आदेश झाला होता आता विकास कुमार यांच्या नावाचा नवीन आदेश जारी करण्यात आला आहे.

बेळगाव पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या यांच्या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले आहे. बेळगाव पोलीस आयुक्त हे पद डी आय जी श्रेणीचे असते.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *