येळ्ळूर : येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत असलेल्या गव्ह. मराठी माॅडेल स्कूलच्या शाळा सुधारणा कमिटीच्या अध्यक्षपदी सौ. रूपा श्रीधर धामणेकर यांची तर उपाध्यक्षपदी श्री. जोतीबा यल्लापा उडकेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या शाळेच्या इतिहासात सौ. रूपा धामणेकर यांना पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून मान मिळाला आहे.
प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. आर. एम. निलजकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सदस्यपदी दिनेश अशोक लोहार, मूर्तिकुमार श्रीराम माने, जोतीबा वामनराव पाटील, विजय चांगाप्पा धामणेकर, मारूती कृष्णा यळगुकर, मधुकर फकिरा नांदुरकर, शशिकांत चांगदेव पाटील, चांगदेव शिवाजी मुरकुटे, अलका सुनील कुंडेकर, दिव्या संदीप कुंडेकर, गायत्री यल्लापा बिर्जे, शुभांगी सुनील मुतगेकर, मयुरी महेश कुगजी, प्रियांका राणोजी सांबरेकर, रेशमा पुंडलिक काकतकर, राजश्री बसवंत सुतार यांची निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत अध्यक्ष सतिश पाटील, एस. डी. एम. सी.चे माजी अध्यक्ष दुद्दापा बागेवाडी, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, जोतिबा चौगुले, प्रमोद पाटील, राकेश परीट, मनिषा मनोहर घाडी, परशराम परीट, अरविंद पाटील, राजू डोण्याणावर, कल्लापा मेलगे, शांता नारायण काकतकर, राजकुंवर पावले आदींच्या उपस्थितीत सदर निवड प्रक्रीया पार पडली.
सौ. ए. वाय. मेणसे यांनी सूत्रसंचालन केले, बी. पाखरे यांनी स्वागत केले तर आभार के. डी पाटील यांनी आभार मानले.
यावेळी पालक शिक्षक आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta