बेळगाव : जीवनात गुरुचे अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच ‘गुरुविण कोण दाखवील वाट’ असं म्हटलं जातं. प्रत्येकांनी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवनात वाटचाल करून यशोशिखर गाठावे असे भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सखल मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले.
गोंधळी गल्ली बेळगाव येथील श्री दत्त मंदिर येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या वह्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री दत्त मंदिरात पूजन आणि महाआरती करण्यात आली.
यानंतर किरण जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वितरीत करण्यात आल्या.
याप्रसंगी बबन भोबे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बबन भोबे, सौरभ कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर, लक्ष्मण पवार यासह मित्र मंडळाचे सदस्य आणि गल्लीतील पंच व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta