Saturday , March 7 2026
Breaking News

दिया इन्स्टिट्यूटचा 13 वा वर्धापन दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांनी मानसिक ताणतणावातून मुक्त राहून संगणक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या जीवनात यश प्राप्त करावे असे आवाहन प्रमुख पाहुण्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले. डाॅ. सरनोबत दिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या कार्यक्रमात बोलताना केले.
डाॅ. सोनाली सरनोबत, संचालिका सोनिया जांग्रा, प्रा पाटील, प्रा गिरण्णावर, हर्षा रगशेट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने 13 व्या वर्धापन दिनाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी संचालिका सोनिया जांग्रा यांनी पाहुण्यांचे पुष्पहुच्छ देऊन स्वागत केले.
दिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी सोनिया जांग्रा यांनी हर्षा रगशेट्टी, अमृता मोरे, पूनम कित्तूर, विजयालक्ष्मी खाडे, रेखा पालेकर यांच्या सहयोगाने चालविली आहे.
संगणक ज्ञानाचे आज जगात अत्यंत महत्व वाढले आहे यासाठी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ज्ञान आत्मसात करावे असे, आवाहन जी. ए. महाविद्यालयाचे प्रा. पाटील व बेनननस्मिथचे प्रा. गिरण्णावर यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सास्कृतिक कार्यक्रम सागर केले. शेवटी हर्षा रगशेट्टी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *