Wednesday , December 10 2025
Breaking News

बेळगावात मुलीचा अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न!

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या सीमावर्ती भागात बालकांना पळवून नेणारी टोळी सक्रीय असून त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील हिंदवाडी पोस्ट ऑफिसजवळ मंगळवारी सायंकाळी नऊ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्याने शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीला चॉकलेट देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणात मुलीने त्याच्यापासून दूर जाण्यासाठी धडपड केली. तिने अपहरणकर्त्याला एक-दोन वेळा चापट मारली आणि आरडाओरडा केला. मात्र, जेव्हा तो तिला उचलण्याचा प्रयत्न करणार तेव्हढ्यात तिथे लोकांची गर्दी झाली. शेवटी तो तिला पकडण्यासाठी पाठलाग करतो. तो तिला सोडून पळून गेल्याची माहिती आहे.

याबाबत मुलीच्या आईने टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता अपहरणकर्त्या मुलीला उचलून पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले.

बेळगाव शहरात अशा घटना घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

About Belgaum Varta

Check Also

चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वादासंदर्भात बेळगाव बिशप यांनी घेतली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट

Spread the love  बेळगाव : गदग जिल्ह्यातील गजेन्द्रगड येथील होली फॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *