
बेळगाव : के एल एस संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या भक्तीसुगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राग आणि विविध भजने सादर करून कैवल्य कुमार यांनी आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
पंडित कैवल्यकुमार यांनी आपल्या मैफिलीची सुरुवात रूपक तालातील गौड मल्हार रागाने केली. नंतर बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल हा मराठी अभंग सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. मराठी अभंग झाल्यावर ओडी बारय्या कृष्णा हा कन्नड अभंग पेश करून मैफिलीचे वातावरण भक्तिमय करून टाकले. सुरांची निर्मिती कशी झाली याचे दर्शन घडवणारा निरंजन सादर करून रसिकांची दाद मिळवली. यंदू काणुवे गुरुवे या कन्नड अभंगाने पंडित कैवल्यकुमार यांनी मैफलीची सांगता केली.
गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, प्राध्यापक वर्ग, संगीतप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने भक्ती सुगंध कार्यक्रमाला उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta