बेळगाव : समर्थनगर येथील श्री एकदंत युवक मंडळ यांच्यावतीने आणि डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या सहकार्याने डेंग्यू आणी चिकूणगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुजन केल्यानंतर श्रीफळ वाढवून शिबिराला चालना देण्यात आली.
यावेळी समर्थ नगर मलिकार्जुन नगर भागातील नागरिकांना डेंग्यू आणी चिकूणगुनिया होमिओपॅथी डोस पाजण्यात आला.
डॉ. प्रकाश राजगोळकर यांनी यावेळी उपस्थितांना आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. मागील सलग 12 वर्षांपासून डेंग्यू आणी चिकूणगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करीत आल्याबद्दल मंडळाच्यावतीने प्रकाश राजगोळकर यांचा यावेळी शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
नागरिकांनी बहुसंख्येने लसीकरणाचा लाभ घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta