Monday , December 8 2025
Breaking News

मुडलगी हत्या प्रकरणी पत्नी, प्रियकराला अटक

Spread the love

 

बेळगाव : अमावस्येच्या मुहूर्तावर मंदिरात आलेल्या पतीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी खून केल्याप्रकरणी पत्नी व प्रियकराला अटक केली आहे.

विद्यार्थी श्रीधर अर्जुन तलवार (21) आणि सिद्धव्वा उर्फ ​​प्रियंका शंकर जगम्मट्टी (21) यांना अटक करण्यात आली आहे.

मुदलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात सोमवारी ही घटना घडली. शंकर सिद्धप्पा जगम्मट्टी (२७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमावस्येनिमित्त हे जोडपे बनसिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले. पाच-सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या शंकर जगम्मट्टीची मंदिराच्या आवारात निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या हत्येमागे पत्नीच्या प्रियकराचा हात असल्याच्या संशयावरून तपास करणाऱ्या मुडलगीड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आरोपींना अटक केली. बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला मार्गदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

टिळकवाडी येथील न्यू शिवाजी कॉलनीतील परिसर बनला कचरा डेपो!

Spread the love  बेळगाव : मंत्री महोदय येती गावा, तोची दिवाळी दसरा अशी काहीशी स्थिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *