Wednesday , March 4 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणूक उद्या

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणूक-उद्या बुधवार दि. २६ रोजी होणार आहे. अध्यक्षपद सामान्य महिलेसाठी आहे तर उपाध्यक्षपद सामान्यसाठी आले आहे. ग्रामपंचायतवर म. ए. समितीची सत्ता आहे. त्यामुळे समितीच्या उमेदवार अध्यक्ष-उपाध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे.

सध्या म. ए. समितीचे १७ सदस्य आहेत. तर भाजपचे दहा आणि काँग्रेसचे दोन व अपक्ष एक असे संख्याबळ असून म. ए.  समितीचा अध्यक्ष-उपाध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे. सध्या ग्रामपंचायतमध्ये सतीश पाटील अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्षपदी लक्ष्मी मासेकर असून त्यांचा कार्यकाळ आता संपणार आहे. आता महिला अध्यक्ष होणार असून कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतवर आजपर्यंत म. ए. समितीचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आताही ते वर्चस्व अबाधित राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *