गोकाक : गतवर्षी गोकाक तालुक्यात अनेक ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात गोकाक सर्कल पोलिसांना यश आले असून, आंतरराज्य चोरट्यांना अटक करून 55.60 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
गत वर्षी 11-11-2022 रोजी विवेकानंद नगर येथील प्रकाश लक्ष्मण टोलीन्नावर यांच्या घरातून तसेच 23-5-2023 रोजी तवग गावातील श्री बिरेश्वर मंदिरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. बेळगावचे एसपी संजीव पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गोकाक सीपीआय गोपाळ राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली.
बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त एसपी एम वेणुगोपाल आणि डीवायएसपी डीएच मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाक सीपीआय गोपाल राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करून महाराष्ट्रातील 8 आरोपींना अटक करून चोरीच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी केली.
अटक करण्यात आलेल्यांकडून 810 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 8.5 किलो वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 55.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सीपीआय गोपाळ राठोड, बेळगाव सीईएन पीएसआय बी. आर. गड्डेकर, हुक्केरी पीएसआय एम. आर. तहसीलदार, गोकाक ग्रामीण ठाणे पीएसआय किरण मोहिते, गोकाक शहर ठाणे पीएसआयपी एम. डी. घोरी, अंकलगी स्टेशनचे पीएसआय एच. डी. येरझरवी आणि कर्मचारी बी. व्ही. नेर्ली, व्ही. आर. नायक, डी. जी. कोन्नूर, एस. व्ही. कस्तुरी, एस. बी. मानेप्पगोळ, एस. एच. इरगर, एम. बी. गिद्दगारी, एम. एम. हल्लोळ्ळी, एस. एस. देवरा, जी. एच. गुडली, एम. बी. तलवार, एस. बी. पुजेरी, आर. एम. टुबाकी आदी या कारवाईत सहभागी झाले होते.
बेळगाव जिल्हा अतिरिक्त एसपी एम. वेणुगोपाळ, सीपीआय गोपाळ राठोड यांनी टीमचे कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta