Sunday , July 26 2026
Breaking News

उद्यमबाग पोलिसांचा राक्षसी प्रताप; अपंग व्यक्तीला मारहाण

Spread the love

 

बेळगाव : खानापूर -बेळगांव रस्त्यावर एका अपंग व्यक्तीवर उद्यमबाग पोलिसांनी अमानुषपणे लाथा बुक्क्यांनी मारहाण करत क्रूरतेचा कळस गाठला आहे. इतकेच करून हे खाकीतील हैवान शांत बसले नाहीत तर त्या अपंग तरुणाला रस्त्याच्या मध्यभागी आणून झोपविले. पोलिसांच्या या कृत्याचा विडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
मंगळवारी रात्री घडलेली घटना उशिराने उघडकीस आली आहे. शहरातील खानापूर रस्त्यावरील एका हॉटेलसमोर ही घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास निरंजन चौगुले नामक अपंग तरुण दुचाकीवरून जेवणाचे पार्सल घेऊन जाण्यासाठी आला होता. हॉटेलमधून पार्सल घेऊन बाहेर पडलेल्या अपंग तरुणाच्या दुचाकीची चावी व मोबाईल हिसकावून घेत उद्यमबाग पोलिसांनी कोणतेही कारण न देता लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पीएसआय व दोन हवालदार या तिघांनी मिळून त्या अपंग तरुणाला केलेली मारहाण पाहून खाकी वर्दीतले रक्षक आहेत की राक्षस? असा प्रश्न बेळगावकराना पडला आहे. पोलिसांच्या हैवानी कृत्याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *