Saturday , March 7 2026
Breaking News

यमकनमर्डी पोलिस ठाण्यात बस नेऊन विद्यार्थ्यांनी छेडले आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी पोलीस ठाण्यात बीरहोली गावातील विद्यार्थ्यांनी बस आणून आंदोलन केले.
संकेश्वर, यमकनमर्डी आणि आसपासच्या शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दररोज बीरहोळी गावातील शेकडो विद्यार्थी येतात. मात्र एक बस सकाळी 9 वाजता येत असल्याने शेकडो विद्यार्थी व नागरिकांना प्रवास करता येत नसल्याने त्यांनी संकेश्वर, हत्तरगी परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन दुसरी बस सकाळी 9 ते 10 या वेळेत सोडण्याची मागणी केली. त्यांनी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी बस पोलीस स्थानकात नेली पोलिसांकडे नेली.
बिरहोळी गावातून दररोज शेकडो विद्यार्थी व जनता यमकनमर्डी येथे जात असल्याने शाळा-महाविद्यालयांना जाण्यासाठी जादा बस सोडण्यात यावी, अन्यथा संकेश्वर आगारात जावून आंदोलन करू, असे विद्यार्थी व पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांच्या समस्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून सोडवल्या जातील, असे आश्वासन वाहतूक नियंत्रक एस.आर.बोनी यांनी दिले.
यावेळी बीरहोळी गावातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *