बेळगाव : वैश्यवाणी युवा संघटना, बेळगाव यांच्यातर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सन 2018 मध्ये युवा संघटनेतर्फे खास बेळगावकरांसाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. बेळगावातील रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमास न भूतो न भविष्यती असा उदंड प्रतिसाद देऊन. वैश्यवाणी युवा संघटनेच्या पुढील वाटचालीस बळ दिले होते. त्यानंतर च्या काळात युवा संघटनेतर्फे विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी करियर मार्गदर्शन, चित्रकला स्पर्धा, कॅशलेस व्यवहारा संबंधी मार्गदर्शन, रक्तदान, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य.. अशाप्रकारे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
आपल्या सर्वांच्या सहकार्य तसेच आशीर्वादाने. आम्ही पुन्हा एकदा येत्या 15 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजता के के वेणू गोपाल हॉल, गोगटे कॉलेज बेळगाव येथे देशभक्तीपर सुंदर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.. तरी बेळगावातील रसिक श्रोत्यांना पुन्हा एकदा विनंती करीत आहोत की आपण या कार्यक्रमाला न चुकता उपस्थित राहून आपल्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या.. अभिमानाचा क्षणाचे भागीदार होऊयात..
Belgaum Varta Belgaum Varta