बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजनासंदर्भात एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. 2006 सालापासून आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगाव येथे अधिवेशन भरवत आले आहे.
त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आली आहे. दरम्यान या वर्षीही महामेळावा घेण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी परवानगी मिळाली की नाही याबाबत विचारपूस न करता 13 डिसेंबर रोजी थेट व्हॅक्सीन डेपो मैदानावर उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन करण्यात आले.
विभागवार बैठका घेऊन महामेळाव्याची जनजागृती करा. असे विचार काहींनी मांडले. तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यात एकत्रित येऊन मागच्या पेक्षा जास्त कार्यकर्ते आणून कर्नाटक शासनाचा निषेध करू. असा निर्धार माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी व्यक्त केला.
माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कार्यकर्त्यांच्या सूचना घेण्यासाठी बैठक घेण्यात आली असून योग्य सूचना कार्यकर्त्यांनी केले आहेत. महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद दाखवून देण्यासाठी आहे. दरम्यान कार्यकर्ते गावाला भेटी देतील. वेळ आणि गावाची माहिती एम. जी. पाटील यांच्याकडे कळवावी. त्यानुसार प्रत्येक गावात जनजागृती केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रातील नेत्यांशी महामेळावा संदर्भात संपर्क सुरू आहे. आम्ही मेळावा कर्नाटक सरकारच्या विरोधात घेत आहे. त्यामुळे पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि नेत्यांना अडवले जाते त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यानाही अडवले जाण्याची शक्यता आहे. तरीही महामेळावा यशस्वी करू. शेतकर्यांच्या पीक नुकसान मुळे अनेक जण अडचणीत आहेत. समिती शेतकर्यांच्या पाठीशी आहे.
सोमवार असल्याने शेतात कमी कामे असतात त्यामुळे शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अशा प्रकारचे आवाहन यावेळी करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अवमान करणारे महाभाग यांचाही बैठकीत निषेध करण्यात आला.
या संदर्भात आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने योग्य ती पावले उचलली जातील, अशी माहिती यावेळी नेत्यांनी दिली.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …