Monday , December 4 2023

हिवाळी अधिवेशन होणारच, सर्व तयारी पूर्ण : पालकमंत्री गोविंद कारजोळ

Spread the love

बेळगाव : आगामी 13 डिसेंबरपासून बेळगावात अधिवेशन होणारचं सगळी तयारी पूर्ण झाली आहे. राज्य सरकारने नोटिफिकेशन केलेलं आहे. बेळगावला येणार्‍या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचार्‍यांची रहाण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे अधिवेशनाबाबत संभ्रम नको असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केलं आहे.
रविवारी सकाळी बेळगावात भाजपचे उमेदवार महंतेश कवटगीमठ यांच्या प्रचाराला आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषद ही सामान्य निवडणूक नव्हे ही केवळ लोकनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार असलेली निवडणूक आहे. बेळगाव जिल्ह्यात 8700 मतदानापैकी भाजपचे निवडून आलेले कार्यकर्ते यांची मतदार संख्या पाच हजार हून अधिक आहे. कोणत्या पक्षाचे सदस्य निवडून आलेत हे समजू शकते. भाजपच्या सदस्यांचा आकडा बघितला तर आम्ही कुस्ती धरायची गरज नाही कुस्ती धरायच्या अगोदरचं आम्ही जिंकू कारण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो. आमचे 5151 पैलवान आहेत. इतर पैलवानांची आम्हाला गरज नाही त्यामुळे ही कुस्ती आम्हीच जिंकणार असा दावा देखील कारजोळ यांनी केला.
दोन वर्षात 120 लॅब आणि लाखो बेड कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने सज्ज केले आहेत त्यामुळे राज्याची आरोग्य व्यवस्था कोरोना विरुद्ध लढण्याची तयार आहे. राज्यात विधान परिषदेत कमीत कमी 15 जागांवर भाजप विजयी होईल या शिवाय बेळगावात कवटगीमठ हेच भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत असेही त्यांनी नमूद केलं.
निवडणुकीनंतर काँग्रेस तोंड दाखवू शकणार नाही : पालकमंत्री
विधानपरिषद निवडणुकीत जिंकण्यासाठी काँग्रेस धडपड करत आहे. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला तोंड दाखविणेही मुश्किल होईल, अशा शब्दात बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे.
बेळगावमध्ये रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2004 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या केंद्र सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. याचाच परिणाम म्हणून 2009 साली झालेल्या निवडणुकीत केंद्रात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आले. यापुढील काळातही भाजपाचीच सत्ता अधिकारात येईल, असा त्यांनी व्यक्त केला.
बेळगावमध्ये होणार्‍या हिवाळी अधिवेशनाची संपूर्ण तयारी झाली असून ठरलेल्या तारखेलाच कोरोना मार्गसूचीनुसार अधिवेशन पार पडेल, असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यानंतर 71 वर्षे काँग्रेसने जनतेला गुलामाची वागणूक दिली. अल्पसंख्याक आणि उपेक्षित लोक काँग्रेसचे ओलीस आहेत. या परिस्थितीत आता बदल झाला असून मोदी सरकारने भारताला काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प केला आहे, असे विधानदेखील त्यांनी केले.
आमचे सरकार विकास कामात मागे राहिलेले नाही. पूर आला. रस्ते आणि घरांची पडझड झाली. गरिबांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची भरपाई देण्यासाठी सातत्याने सरकार कार्यरत असून परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार अनेक निर्णय घेत असल्याचेही कारजोळ यांनी सांगितले
महांतेश कवटगीमठ हे एक सज्जन राजकारणी आहेत. विधान परिषदेच्या सदस्यपदावरून त्यांनी अनेक उत्तमोत्तम कामे केली आहेत. ग्रामीण भागात गावांच्या सुधारणेचे काम केले आहे. त्यांच्या कार्यानुसार या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असून काँग्रेस विनाकारण धडपड करत असल्याचे सांगत निवडणुकीनंतर काँग्रेसला तोंड दाखविणे मुश्किल होणार आहे, अशा शब्दात टोलाही लगावला.
पत्रकार परिषदेला खासदार मंगला अंगडी, भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, शहर घटक अध्यक्ष शशिकांत पाटील, भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ, आमदार अनिल बेनके आदींसह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महामेळावा पूर्वतयारीसाठी उद्या व्हॅक्सीन डेपो येथे समिती कार्यकर्त्यांनी जमावे

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 4 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *