बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित बुद्धिबळ महोत्सवात गोल्डन चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
आठ वर्षांखालील वयोगटात मुलांच्या विभागात गीतेश सागेकर याने दुसरा क्रमांक तर सुयश उडकेरी याने तिसरा क्रमांक पटकाविला. दहा वर्षांखालील वयोगटातील मुलांच्या विभागात अनिरुद्ध दासरी याने पहिला तर गितेश सागेकर याने दुसरा क्रमांक मिळविला. बारा वर्षांखालील वयोगटात मुलांचा विभागात माधव दासरी याने पहिला क्रमांक तर शिवनागराज ऐहोळे याने तिसरा क्रमांक मिळविला. 14 वर्षांखालील वयोगटात उपाध्ये याने तिसरा क्रमांक मिळविला.
आठ वर्षांखालील वयोगटात मुलींच्या विभागात आदित्री मिराजी हिने तिसरा क्रमांक बारा वर्षांखालील वयोगटात वैष्णवी व्ही. हिने दुसरा क्रमांक तर 14 वर्षाखालील वयोगटातही वैष्णवी व्ही. हिने दुसरा क्रमांक पटकाविला.
बीडीसीए उपाध्यक्ष दत्तात्रयराव व अन्य मान्यवरांच्या हस्ते या विजेत्या बुद्धिबळपटूंना गौरविण्यात आले. बुद्धिबळ प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांचे या बुद्धिबळपटूंना मार्गदर्शन लाभत आहे. या बुद्धिबळपटूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेकरिता करण्यात आली आहे.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …