खानापूर (प्रतिनिधी) : जांबेगाळी (रेडेकुंडी) (ता. खानापूर) येथील शेतकरी प्रकाश बाळकृष्ण देसाई (वय 46) हे आपल्या बैलगाडीतून शेतात मळणी केलेले भात आणण्यासाठी शनिवारी दि. 4 रोजी सायंकाळी जात असताना बैलगाडी पलटी झाल्याने प्रकाश देसाई यांना जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांना समजताच त्यांनी खानापूर सरकारी दवाखान्यातील शवागृहात प्रत्यक्ष भेट देऊन मृतदेह उतरीयतपासणीसाठी डॉक्टर भेटून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यास मदत केली.
यावेळी सरकारी दवाखान्यात मृतदेहाची डॉक्टरनी उतरीयतपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नंदगड पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.
Check Also
शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या …