Saturday , July 27 2024
Breaking News

निपाणीत ‘नेसा’तर्फे मॅरेथॉन स्पर्धा

Spread the love

1630 स्पर्धकांचा सहभाग : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी : मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वयामध्ये कोणत्याही गोष्टीचा केव्हाही व कोठेही कसाही अस्वाद घेऊ शकतो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करून अनेक गरुड भरार्‍या घेऊ शकतो. पण हे सर्व करत असताना त्याचे आरोग्य जर त्याला साथ देत नसेल तर हे सर्व हवेत विरून जाते. हीच नाळ पकडून राष्ट्रीय स्तरावर ज्याप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. अगदी त्याच धर्तीवर रविवारी (ता.5) निपाणीमध्ये सर्व नागरिकांना याची देही याची डोळा प्रत्यय आल्याचे जाणवते. आपले सर्वांचे आरोग्य सदृढ असणे किती महत्त्वाचे असते त्याचा प्रत्यय आला. निपाणी एन्डयुरन्स स्पोर्ट्स असोसिएशन (नेसा) मार्फत निपाणीमध्ये प्रथमच भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धा सर्व वयोगटासाठी (स्त्री/पुरुष) 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटरसाठी आयोजित करण्यात आली होती. सदरच्या स्पर्धेला सकाळी 6 वाजता मुन्सिपल हायस्कूल ग्राउंड येथून सुरूवात झाली. चंद्रकांत सपकाळे, राजू जडी, गुरुप्रसाद देसाई, केदार हिरेकुडी, अमरजित पाटील व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरमधील आयर्न मॅन डॉ. संदेश बागडे, विनय कुलकर्णी उपस्थित होते. स्पर्धांमध्ये खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह नगरसेवक आणि 4 ते 80 वयापर्यंतच्या नागरिकांनी सहभाग घेतला होता.
यशस्वीरित्या मॅरेथॉन पूर्ण करणार्‍या सर्व स्पर्धकांना देवचंद महाविद्यालय आणि जी.आय बागेवाडीमधील एनसीसी कॅडेटच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत निपाणी शहर व परिसरातील तब्बल 1630 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना ऑन रूट हायड्रेशन सपोर्ट उपलब्ध होता. स्पर्धेपूर्वी वार्म अपसाठी झुंबा व रनिंगनंतर कूलडाऊन स्ट्रेचिंग एक्सरसाइजची सोय करण्यात आली होती. या स्पर्धेला परिसरातील उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला असून यानंतर देखील अशा स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यावेळी डॉ. संदीप चिखले, अतिश खोत, डॉ. शिवानंद दुमाले, महादेव कुलकर्णी, सनत जमदाडे, अर्जुन जनवाडे, प्रमोद निळेकर, देव टिंगरे, जयदीप गुरव, सचिन कुलकर्णी, शशी शाह, डॉ. सुहास पाटील, संजय हालभावी, साईराम अकोळे, तुषार माळी, विनोद साबळे, दीपक मेंडगुले, अमर संकपाळ, अश्विन पाटील, पवन ऋतूनावर, पंकज देशमाने, जयंत दुधाळकर, मिलिंद मेहता, स्वप्नील हरेल, सोमनाथ कोळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

व्हटकर कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

Spread the love  निपाण (वार्ता) : येथील जत्राट वेस मधील रहिवासी तिरुपती व्हटकर यांच्या अंगावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *