बेळगाव : बेळगाव जाधवनगर येथील एनसीसी मुख्यालयासमोर एक विद्युत खांबाला जोडलेली विद्युतभारित वायर तुटून पडली होती. हा प्रकार लक्षात येताच कॅम्प पोलीस स्थानकाचे अधिकारी विनोद महालमनी यांनी लागलीच हेस्कॉम अधिकार्यांना याची कल्पना दिली. हेस्कॉमने तातडीने दाखल होत त्या तुटलेल्या वायरचा भाग पुन्हा जोडला असून अनर्थ टाळला गेला आहे.
एक जर्मन शेफर्ड श्वान नुकतेच विद्युतभारित तार लागल्यामुळे मृत्यूमुखी पडल्याची घटना शहरात घडली. त्यामुळे अशा प्रकारच्या वायरचा गंभीर धोका निर्माण झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून विनोद महालमनी यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे सध्या कौतुक होत आहे.
परिसरातील नागरिकांनी बेळगाव पोलिस आयुक्तांचेही आभार मानले असून असे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस दलात असल्याबद्दल कौतुक केले आहे.
Check Also
उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …