बेळगाव : नि:स्वार्थ समाज सेवेबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कल या सेवाभावी संघटनेचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचा आज पाॅलाइट्स ऑफ बेळगाम वर्ल्ड वाईड यांच्यातर्फे आज खास पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूल येथे आज मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे औचित्य साधून या सत्कार करण्यात आला.
यावेळी संतोष दरेकर यांना आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय समाजसेवेबद्दल खास पुरस्कार व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संतोष दरेकर हे सेंटपॉल हायस्कूलचे 1996 साली दहावी उत्तीर्ण माजी विद्यार्थी आहेत. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या दरेकर हे आपल्या फेसबुक फ्रेंड्स सर्कल या संघटनेच्या माध्यमातून रक्तदानाच्या बाबतीत भरीव कार्य करत आहेत. याखेरीज गोरगरीब असहाय्य लोकांना वैद्यकीय सुविधा तसेच जीवनावश्यक साहित्याचे सहाय्य करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो. आपल्या या सहाय्याद्वारे त्यांनी असंख्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे. दरेकर यांच्या वैद्यकीय सहाय्यामुळे केल्या 17 वर्षात असंख्य रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
कोरोना प्रादुर्भाव काळात त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. जनहितार्थ कार्य करण्याबरोबरच संतोष दरेकर मूक प्राणी -पक्षांच्या हितासाठी देखील नेहमी कार्यरत असतात.
त्यांच्या आजच्या सत्काराप्रसंगी सेंट पॉल्स हायस्कूलचे प्राचार्य फादर डॉ. सेव्हिओ एम्ब्रू, फादर फर्नांडिस, पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईडचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, सेक्रेटरी अनिकेत क्षत्रिय आदी मान्यवर उपस्थित होते. 225 जणांनी रक्तदान केले.
Belgaum Varta Belgaum Varta