Tuesday , December 9 2025
Breaking News

25 ते 27 ऑगस्टदरम्यान शहरात पाणीपुरवठा खंडित!

Spread the love

 

बेळगाव : शुक्रवार दि. 25 ऑगस्ट ते रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 या कालावधीत शहरात पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
हिडकल डॅम येथील विद्युत केंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे हेस्कॉमकडून 10 एमव्हीए 110/33 केवी पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात येणार आहे, असे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
हेस्कॉमचा10 एमव्हीए 110/33 केवी पॉवर ट्रान्सफॉर्मर हा संपूर्ण बेळगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीचा ट्रान्सफार्मर आहे तो बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुंदरगी आणि तुमरगुद्धी पंप हाऊसचा वीज पुरवठा बंद असणार आहे. परिणामी 25 ते 27 ऑगस्ट या कालावधीत बेळगाव शहरातील 24 तास पाणीपुरवठा डेमोझोंसह विविध भागातील पाणीपुरवठा खंडित असणार आहे.
बेळगाव शहराच्या दक्षिण भागातील मजगाव, नानावाडी, चिदंबर नगर, शहापूर, वडगाव जुने बेळगाव तर उत्तर भागातील सह्याद्री नगर, टीव्ही सेंटर, सदाशिवनगर, बसव कॉलनी, कलमेश्वर नगर, सुभाष नगर, अशोक नगर, एम एम बडवाने एरिया, न्यू गांधीनगर, कणबर्गी, कुडची तसेच कॅन्टोन्मेंट प्रदेश, हिंडाल्को फॅक्टरी, केएआयडीबी औद्योगिक वसाहत, इन रूट व्हिलेज टॅपिंग, डिफेन्स एरिया, सैनिकनगर, केएलई हॉस्पिटल, बीम्स हॉस्पिटल आदी भागात पाणीपुरवठा खंडित होणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन एल अँड टी कंपनीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *